डिजिटल युगात कायदेशीर स्पष्टता

🤝 नमस्ते नमस्कार तुमचे मनापासून स्वागत

मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. माझे हे कार्य तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे आणि आदराने सेवा देण्यासाठी समर्पित आहे.

मी ॲडव्होकेट सुनील मारोती तायडे,

सायबर कायदा (Cyber Law) व डिजिटल पुराव्यांचे (Digital Evidence) तज्ञ आणि legalhelp.tech या संकेतस्थळाचा संस्थापक आहे.

तंत्रज्ञानाशी संबंधित क्लिष्ट कायदे प्रत्येक सामान्य नागरिकाला समजतील अशा सोप्या भाषेत मांडणे, हे माझे ध्येय आहे. कोणत्याही बोजड शब्दांचा वापर न करता, तुम्हाला स्पष्ट आणि प्रामाणिक कायदेशीर मदत देण्यासाठी मी येथे आहे.

आज आपण अशा जगात वावरत आहोत जिथे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, पण डिजिटल जगाचे कायदे मात्र सर्वांना माहित नाहीत. हीच तफावत (दरी) दूर करणे हे माझे उद्दिष्ट आहे. मी सायबर कायद्यासारखे कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे अधिकार सहजपणे समजतील. तुम्ही शहरातील असा किंवा गावातील, कायदा हा सर्वांना समजेल असा सोपा असावा, यावर माझा ठाम विश्वास आहे.

💡 माझा विचार (My Thinking)

प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी न्यायालयात धाव घ्यावी, असे मला वाटत नाही. अनेक प्रकरणे आपापसातील चर्चा, सामंजस्य आणि तडजोडीने सहज सुटू शकतात.

तुमचा वकील म्हणून तुम्हाला योग्य मार्ग दाखवणे, तसेच तुमचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचवणे, हे मी माझे कर्तव्य समजतो.

सायबर कायदा, डिजिटल पुरावा आणि आधुनिक कायदेशीर आव्हानांवर तज्ञ मार्गदर्शन

सोशल मीडिया अकाउंट्स

📱 फोन/व्हॉट्सअॅप / Arattai / टेलिग्राम / Signal / Instagram: +91-9420435783

✉️ ईमेल ऍड्रेस: info@legalhelp.tech